Uncategorized

आमदार समाधान आवताडे यांनी घेतली बँक अधिकाऱ्यांची आढावा बैठक

पीक कर्ज, शैक्षणिक कर्ज, मुद्रा लोन, विश्वकर्मा योजना तसेच विविध महामंडळा द्वारे कर्ज वेळेत उपलब्ध करून द्या : आमदार समाधान आवताडे

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर : प्रतिनिधी  -पंढरपूर येथे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन-२०२५ मधील कर्ज वाटप समिती आढावा सभा बैठकीचे आयोजन पंढरपूर पंचायत समिती येथील शेतकी भवन करण्यात आले होते.

या बैठकीत पीक कर्ज वाटप, मुद्रा लोन, विविध महामंडळ, सोसायटी संदर्भातील नागरिकांच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या.
यावेळी सर्व खाजगी आणि सरकारी बँकांचे प्रतिनिधी याचबरोबर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार समाधान आवताडे यांनी पीक कर्ज, शैक्षणिक कर्ज तसेच महामंडळाचे कर्ज वाटप करताना कागदपत्रावरून शेतकऱ्यांची अडवणूक करू नये. तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना बँकांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
ते पुढे बोलताना म्हणाले की बँकांच्या कर्मचाऱ्यांनी बँकेत आलेल्या शेतकरी ग्राहकांशी व्यवस्थितरित्या संवाद साधावा. लाडकी बहीण योजनेचे पैसे पीक विमा रक्कम व इतर अनुदान कर्ज खात्यात जमा करू नये. ज्या कर्जदाराला इन्शुरन्स घ्यायचा नसेल तर त्याचा इन्शुरन्स घेण्याचा जबरदस्ती करू नये. कर्जा वाटपा बाबत गावोगावी मेळावे घेऊन शासनाच्या आदेशानुसार सिबिल न पाहता गरजू लोकांना वेळेत कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. अशा सूचना सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी त्यांनी ग्रामीण बँकेचे काम चांगले आहे. परंतु एखाद्या शाखेच्या चुकीच्या कामामुळे बँकेचे नाव खराब होत असल्याची खंत व्यक्त करत बँकांनी कर्ज देताना कागदपत्रावरून अडवणूक करू नये गरजू लोकांना वेळेत कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

इथून पुढे दर तीन महिन्याला शेतकरी आणि बँक अधिकारी यांचे कर्ज वाटपाबाबत बैठक घेतली जाईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close