२५ व २६ आक्टोंबरला भोसे येथे मैत्री महोत्सव २०२२
रायगड परिवार व ॲड ऑन पॉवर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मैत्री महोत्सव याहीवर्षी आयोजन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-रायगड परिवार व ॲड ऑन पॉवर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मैत्री महोत्सव याहीवर्षी आयोजित केलेला आहे . गतवर्षी पंढरपूर तालुका व परिसरातून १६०० मित्र-मैत्रिणींचे ग्रुप तसेच काही सहकुटुंब सहभाग घेतला होता.
आपण दिवाळीच्या निमित्ताने दहावी-बारावी , महाविद्यालयीन तसेच कुटुंबातील सर्वजण एकत्र येत असतो . मित्रमैत्रिणी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देत असतात ,गप्पा मारतात , हसतात , खेळतात , सुख-दुःखाच्या आठवणीमध्ये रमतात आणि त्यानंतर हॉटेल ला जाऊन जेवण करतात , याच संकल्पनेतून आपण हा मैत्री महोत्सव साजरा करत आहोत. वर्षानुवर्ष न भेटणारे मित्र मैत्रिणी , नातेवाईक एकत्र येतात .
आपल्या एकत्र येण्यातून भेटण्यातून जो आनंद मिळतो तो आनंद शब्दात सांगता येत नाही त्यामुळे आपल्या मित्र-मैत्रिणी कुटुंबीय यांच्याशी चर्चा करा आणि लवकर बुकिंग करा. तुमच्या या अनमोल क्षणांसाठी आम्ही मैत्री महोत्सवाच्या निमित्ताने नक्की छान अशीच साथ देऊ…
यावर्षी शाकाहारी व मांसाहारी जेवणाच्या बरोबरच महाराष्ट्राची महागायिका कलर्स मराठी वाहिनी वरील “ सुर नवा ध्यास नवा “फेम विजेता कु. राधा खुडे यांच्या म्युझिक शो चा सुद्धा आनंद घेता येणार आहे..
त्यामुळे आपल्या मित्रांशी , मैत्रिणीशी ,कुटुंबियांशी नातेवाइकांशी चर्चा करा . कॅाल , व्हाट्सअप , फेसबुक , स्टेटस , इंस्टाग्राम च्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधा व लवकरच बुकिंग करा व सुवर्णक्षणांचे साक्षीदार व्हा.
दिनांक 25 व 26 ऑक्टोबर 2022 रोजी रायगड लॉन्स भोसे ता.पंढरपूर जि. सोलापूर
टीपः लवकर बुकिंग केल्यास तुम्हाला हवा असलेल्या दिवशी आपली सर्व व्यवस्था करण्यात येईल..
आयोजकः ऍड ऑन पॉवर प्रायव्हेट लिमिटेड , पुणे .
संपर्कः. 9518969010 / 8830007883 / 9403867791
( माझा १ मित्र मला या मैत्री महोत्सवात २२ वर्षानी भेटणार आहे. तो आनंद शब्दात सांगता नाही प्रा. महादेव तळेकर
9922252235)