पंढरपूर एज्युकेशन सोसायटी सेवक सहकारी पतसंस्थेचे नूतन चेअरमनपदी राजेश धोकटे व व्हॉइस चेअरमनपदी प्राचार्य डॉ एच आर वाघमारे यांची बिनविरोध निवड

चेअरमन -राजेश धोकटे सर
व्हा. चेअरमन -प्राचार्य एच. आर. वाघमारे सर
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-पंढरपूर एज्युकेशन सोसायटी सेवक सहकारी पतसंस्थेचे नूतन चेअरमनपदी द. ह. कवठेकर प्रशालेतील कर्तव्यदक्ष व विद्यार्थी प्रिय शिक्षक राजेश धोकटे सर व व्हॉइस चेअरमनपदी अध्यापक विद्यालय पंढरपूरचे प्राचार्य डॉ एच आर वाघमारे सर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या संस्थेच्या पदाधिकारी निवडीबाबत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पंढरपूर चे अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी बी सावंत अधिकारी श्रेणी-१ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पंढरपूर यांचे अध्यक्षतेखाली आज दिनांक 7ऑगस्ट 2024 रोजी सकाळी दहा वाजता अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस नूतन संचालक अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य एच आर वाघमारे सर, द.ह. कवठेकर प्रशालाचे मुख्याध्यापक . व्ही एम कुलकर्णी सर तसेच पतसंस्थेचे सचिव ज्येष्ठ शिक्षक सुधीर मागाडे सर, ज्येष्ठ संचालक प्रशांत मोरे सर, नूतन संचालक मानाजी गावडे सर, नूतन संचालक वाडेकर सर, दत्तात्रय पाटोळे सर, तानाजी लिंगडे, महिला संचालिका सौ मोहिते मॅडम व सौ प्रज्ञा उत्पात मॅडम सर्वजण उपस्थित होते. नूतन चेअरमन राजेश धोकटे सर यांनी यापूर्वीही या पतसंस्थेचा 6 वर्ष कारभार अतिशय उत्तम प्रकारे चेअरमन म्हणून सांभाळलेला आहे. नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या निवडीबद्दल पतसंस्थेचे सर्व सभासद बंधू-भगिनी, संस्थेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी या सर्वांनी समाधान व्यक्त केले व त्यांच्या पुढील यशस्वी कार्यास शुभेच्छा दिल्या.