प्रणिती शिंदे यांचे प्रचारार्थ कासेगाव येथे 20तारखेस जाहीर सभा…..
आ. अमित भैय्या देशमुख,आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील आ. विश्वजीत कदम साहेब हे उपस्थित राहणार

जोशबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-42 सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया आघाडी व काँग्रेस (आय) पक्षाच्या अधिकृत उमेदवार कु.प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ, दिनांक 20 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता महामाया देवी मंदिर पटांगण,. कासेगाव, ता.पंढरपूर येथे सभेचे आयोजन केले असून या सभेला संबोधित करण्यासाठी आमदार अमित भैय्या देशमुख,आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब, आमदार विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम साहेब हे उपस्थित राहणार असून सर्व मतदार बंधू- भगिनी,इंडिया आघाडी मधील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, विठ्ठल परिवारातील सर्व कार्यकर्ते,पत्रकार बंधू आणि भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवकनेते भगीरथदादा भारत भालके यांनी केले आहे.
सोलापूर लोकसभेच्या महविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या समवेत डॉ.सौ.प्रणिता भगिरथ भालके यांचा पुळुजवाडी, शंकर गाव (नळी), आंबेचिंचोली या गावामध्ये गावभेट दौरा संपन्न झाला…