Uncategorized

स्वेरीमध्ये ‘अॅप्लीकेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर प्रॉडक्ट डेव्हलपमेंट अँड रिसर्च’ या विषयावर कार्यशाळा संपन्न

छायाचित्र- स्वेरीतील विद्यार्थ्यांना ‘अॅप्लीकेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर प्रॉडक्ट डेव्हलपमेंट अँड रिसर्च’ या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करताना इन्सेटमध्ये ‘जिष्ट’ तथा ग्लोबल इनोव्हेशन थ्रू सायन्स अँड टेक्नोलॉजी फोरमचे सदस्य डॉ.आनंद राव.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

संपादक-श्रीकांत कसबे

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग व कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अॅप्लीकेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर प्रॉडक्ट डेव्हलपमेंट अँड रिसर्च’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ‘जिष्ट’ तथा ग्लोबल इनोव्हेशन थ्रू सायन्स अँड टेक्नोलॉजी फोरमचे सदस्य डॉ.आनंद राव हे अमेरिकेतील बोस्टन या शहरामधून स्वेरीतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करत होते.
स्वेरीचे संस्थापक सचिव तसेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार व कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.स्वाती पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार व आयआयसी प्रेसिडेंट डॉ.विद्याराणी क्षीरसागर यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ.आनंद राव यांनी आपल्या मार्गदर्शनातून ‘डेटा सायन्सच्या मूलभूत गोष्टी, त्याची साधने आणि विविध तंत्रज्ञान जाणून घेऊन त्याचा वापर कसा करायचा हे समजावून सांगितले. विविध उद्योगांमध्ये डेटा सायन्सचा वास्तविक वापर जाणून घेणे व डेटा सायन्समध्ये करिअर करण्यासाठी आवश्यक कौशल्ये या विषयी माहिती दिली. मशीन लर्निंगच्या मूलभूत गोष्टी, चॅट जीपीटी या सारख्या विविध नवनवीन तंत्रज्ञानाची तसेच मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगमध्ये वापरले जाणारे टूल्स, फ्रेमवर्क आणि तंत्रज्ञानाबद्दल विस्तृतपणे माहिती दिली. मशीन लर्निंग आणि डीप लर्नींगचा वास्तविक जगात वापर करण्यासाठीचा दृष्टीकोन कसा विकसित करावा हे देखील त्यांनी समजावून सांगितले. ‘जेंव्हा विद्यार्थी मशीन लर्नींग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये करिअरच्या दृष्टीने काम करतील तेव्हा त्यांना त्या क्षेत्रात उत्तम पद्धतीने कामगिरी करता येईल’ असे प्रतिपादन केले. या कार्यशाळेला प्राध्यापक व जवळपास २४० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.स्मिता गावडे, डॉ.निखिलेशकुमार मिश्रा व एमसीएचे विभागप्रमुख प्रा.मनसब शेख यांनी काम पाहिले. विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.


Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close