डॉ. बाबासाहेब आंबेडकर 131 व्या जयंतीनिमित्त अमरभिम सांस्कृतिक मंडळाची कार्यकारणी जाहीर
अध्यक्षपदी सुरज पाटील तर सचिव पदी कृष्णा सर्वगोड

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:- येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील अमरभिम सांस्कृतिक, कला, क्रिडा व शैक्षणिक मंडळ संचलित व्यायाम शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीची बैठक मंडळाचे संस्थापक सुनिल सर्वगोड यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळाचे जेष्ठ सदस्य अनिल ऐदाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यामध्ये जयंती उत्सव समितीची नूतन कार्यकारणी निवडण्यात आली, यामध्ये अध्यक्ष पदी सुरज पाटील, सरचिटणीस पदी कृष्णा ऊर्फ अण्णा सर्वगोड, कार्याध्यक्ष पदी शुभम ठोकळे, खजिनदार पदी अक्षय खरबडे, लेझिम प्रमुख पदी गणपत सर्वगोड, आकाश भोपळे, कपिल सर्वगोड, विवेक सर्वगोड उपाध्यक्ष पदी युवराज माने,लल्लू शेख, लक्ष्मण पवार सहसचिव पदी कार्तिक ढवळे यांची निवड करण्यात आली.
मागील वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती महोत्सवानिमित्त चांगले उपक्रम राबविल्याबद्दल माजी अध्यक्ष व इतर पदाधिकार्यांचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला.
ह्या बैठकीमध्ये डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंती उत्सवा निमित्त सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबविणे, वृक्षारोपण करणे, रक्तदान शिबीर राबविणे, गरजू लोकांना मदत करणे. असे उपक्रम राबवून जयंती महोत्सव साजरा करण्याचा निर्धार अमरभिम सांस्कृतिक मंडळ संचलित व्यायाम शाळा यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी RPI युवक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अॅड.किर्तीपाल सर्वगोड, राजू बनसोडे, सुरेश सावंत, चंद्रकांत सर्वगोड, राजू ढवळे, डॉ. प्रशांत सर्वगोड, गणपत सर्वगोड, बाळासाहेब साखरे, सुरेश बिनवडे, शाहू सर्वगोड, ज्ञानोबा ऊर्फ बापू सर्वगोड, उमेश सर्वगोड पत्रकार अभिराज उबाळे, पत्रकार अपराजित सर्वगोड, बापू खिलारे, नंदू सर्वगोड, अविनाश आवचारे, पिंटू रणपिसे, राहुल सर्वगोड, चोखा सर्वगोड, रवी सर्वगोड, आनंद सर्वगोड, विठ्ठल सर्वगोड, अंकुश कदम, प्रशांत सर्वगोड, गणेश उबाळे, सतिश सर्वगोड, दत्ता लोंढे, सूरज साखरे, अमोल पाटील, सुनिल आगावणे, परसू पवार, अर्जुन आंबेकर, दिपक नाईकनवरे, संदेश कांबळे, भूषण सर्वगोड, सिताराम वाघमारे, आकाश बनसोडे, आकाश सर्वगोड अदिसह पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.