विरोचन सिद्धेश्वर करळे याने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक पटकावला



जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
– श्रीकांत कसबे
पंढरपूर :- रयत शिक्षण संस्थेचे, यशवंत माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, भोसे (क) चा विद्यार्थी विरोचन सिद्धेश्वर करळे. याने, दि.५/१/२०२६ ते ६/१/२०२६ मध्ये स्वेरी कॉलेज गोपाळपूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात लहान गट (६ वी ते ८ वी) मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. त्याला विभागप्रमुख सौ. पाटील मॅडम, विषयशिक्षक . करळे सर, वर्गशिक्षिका सौ. गोटणे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानिमित्त त्याचा विद्यालयामार्फत जाहीर सत्कार करण्यात आला.

उपकरणाचे नाव:- Hand Gesture Controlled Car
वैशिष्ट्य:- ही कार हाताच्या इशाऱ्यावर चालते.360 अंश कोनामध्ये G टर्न घेते. या तंत्राच्या साह्याने धोकादायक ठिकाणी काम करण्यासाठी प्रत्यक्ष ऑपरेटर ला मशीन मध्ये न बसता, हाताच्या केवळ इशाऱ्यावर यंत्रे काम करू शकतात.
उपकरणाचे कौतुक, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य, गणेशदादा पाटील यांनी केले, तसेच स्कूल कमिटी सदस्य एन. व्ही. काळे सर, पर्यवेक्षक जरे सर, मुख्याध्यापक कुंभार सर यांनी विरोचन चे अभिनंदन केले.



