कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांसाठी उपलब्ध सुविधांची जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी केली पाहणी

कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांसाठी उपलब्ध सुविधांची
जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी केली पाहणी
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर –दि. 11 : – कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक पंढरपूरात येतात. यात्रा कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांना मंदीर समिती तसेच प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या सोयी-सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आज यांनी केली.
यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, उपमुख्याधिकारी सुनील वाळुंजकर तसेच संबधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
पंढरपुरात कार्तिकी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणत भाविक दाखल झाले आहेत. भाविकांना सहज आणि सुलभरित्या दर्शन मिळावे यासाठी मंदीर समिती कडून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधांची पाहणी केली. मंदिर समितीकडून दर्शन रांगेत कुलर ,फॅन , पायाखाली मॅट ,मंडपाची व्यवस्था तसेच पोलीस सुरक्षासह वैद्यकीय यंत्रणा लाईव्ह दर्शन व्यवस्था तसेच प्रशासनाकडून भाविकांच्या आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केली.
यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी भक्ती सागर (65 एकर) येथे वारकरी भाविकांसाठी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सुविधामध्ये शौचालय सुविधा, पाणी पुरवठा सुविधा आरोग्य सुविधा याची पाहणी केली. भाविकांच्या आरोग्य सुरक्षततेसाठी मुबलक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध ठेवावा. तसेच आपत्कालीन कक्षातील नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सोयी सुविधा बाबतची वेळोवेळी पाहणी करून. पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध आहेत का नाही याची पाहणी करून तात्काळ सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी जयवंत बोधले महाराज यांनी भक्ती सागर 65 एकर येथे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी प्रशासनाकडून वारकरी भाविकांना देण्यात आलेल्या सोयी-सुविधांची माहिती दिली. तर मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदीर समितीकडून वारकरी-भाविकांना देण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिली. तसेच मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी नगरपालिका प्रशासनाकडून 65 एकर, वाळवंट,पत्राशेड तसेच शहरात आरोग्याच्या दृष्टीने उपलब्ध सुविधा, अतिक्रमण मोहिम, शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकाश व्यवस्था आदीबाबत माहिती दिली.
000000000