पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्या वतीने नगर पालिका कर्मचार्यांच्या विविध मागण्यांबाबत निदर्शने

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-महाराष्ट्र राज्य नगरपंचायत नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्रातील नगरपरिषद कर्मचार्यांच्या विविध मागण्यासाठी 30 ऑक्टोंबर २०२३ रोजी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय राज्य संघर्ष समितीने घेतलेला आहे महाराष्ट्रातील नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी दिनांक २० मार्च २०२३ रोजी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व सर्व सचिवांसह मीटिंग झाली होती या मीटिंगमध्ये अनेक निर्णय होऊन सुद्धा अध्याप पर्यंत त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे मा आयुकत तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांचे कार्यालया समोर पाच हजार नगरपरिषद कर्मचाऱ्यांसह बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय राज्याचे कामगार नेते डॉ.डी एल कराड, अँड. सुरेश ठाकूर, डी.पी शिंदे, रामगोपाल मिश्रा, संतोष पवार, अनिल जाधव, अँड.सुनिल वाळूजकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला आहे त्यास अनुसरून आज या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी
पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेचे वतीने राज्याचे जनरल सेक्रेटरी अँड. सुनील वाळूजकर पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, सहकार्याध्यक्ष शरद वाघमारे,नागनाथ तोडकर, उपाध्यक्ष संतोष सर्वगोड,जयंत पवार, धनंजय वाघमारे अखिल भारतीय मजदूर सफाई काँग्रेसचे अध्यक्ष गुरु दोडिया यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली व मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांना निवेदन देण्यात आले
यावेळी बोलताना राज्याचे जनरल सेक्रेटरी अँड. सुनिल वाळूजकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत बाबत औरंगाबाद खंडपीठ यांनी जो स्थगिती आदेश दिला आहे तो उठवण्यासाठी शासनावर दबाव टाकण्यासाठी व शासना तर्फे चांगला विधीज्ञ नेमून लवकरात लवकर स्थगिती आदेश उठवून महाराष्ट्रातल्या बौद्ध मातंग व इतर सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देणे आवश्यक आहे, महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकांना वेतन अनुदान प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला नगरपालिकांना मिळावे, नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांना व सफाई कर्मचारी यांना विना शर्त विना अट कोणतेही शैक्षणिक अहर्ता अट न घालता समावेशन करावे व सफाई कर्मचारी यांची आकृतिबंधा मध्ये पदे निर्माण करून त्यांना विना शर्त विना अट सेवेत कायम करावे व सेवेत असताना मयत झाल्यास अनुकंपा व वारसा हक्क योजना लागू करावी, स्वच्छता व आरोग्य निरीक्षक यांचे विकल्प त्वरित मागवून त्वरित त्यांचे समावेशन करावे, तसेच कंत्राटी हंगामी कर्मचारी यांना सेवेत कायम करावे व सेवेत कायम होईपर्यंत समान काम समान वेतन प्रमाणे किमान वेतन देण्यात यावे तसेच गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित असलेली अनुकंपाची सर्व पदे त्वरित भरावीत, नगरपरिषदेमधील सर्व सफाई कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी यांना वरिष्ठ पदोन्नती मिळावी व १२ वर्ष व २४ वर्षाची आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा तसेच १०,२०,३० ची आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत त्वरित आदेश निर्गमित करावेत , सेवानिवृत्त झालेल्या सर्व सफाई व इतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारे उपदान व रजा वेतन वेतन हे त्वरित मिळावे, महाराष्ट्रातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत मोफत घरे त्वरित देण्यात यावीत, संवर्ग कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या समुपदेशन द्वारे करावे गैरसोयीच्या बदल्या टाळाव्यात तसेच सर्व संवर्ग कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या त्वरित कराव्यात व इतर सर्व मागण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण आंदोलन करण्यात येत आहे या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात येत आहे तसेच पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांना रू 12500 मिळावा दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे सातव्या वेतनाचा चौथा हफ्ता मिळावा सेवानिवृत्त झालेल्या व स्वेच्छा घेतलेल्या अथवा मयत झालेल्या कर्मचाऱ्यांना उपदान व रजा वेतनाच्या थकीत रक्कमा मिळावेत तसेच दिवाळीपूर्वी सर्व कर्मचारी व पेन्शनर कर्मचारी यांना एक तारखेला वेतन व पेन्शन मिळावी अशी मागणी करण्यात आली यावेळी नूतन मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घेण्यात येईल व सर्वांची दिवाळी गोड करण्यात येईल तसेच एक तारखेला सर्वांचे वेतन अदा केले जाईल असे आश्वासन यावेळी दिले
यावेळी कामगार नेते संतोष सर्वगोड, जयंत पवार, धनंजय वाघमारे, दिनेश साठे, दशरथ यादव, दत्तात्रय चंदनशिवे, प्रीतम येळे, अनिल अभंगराव,संजय वायदंडे,संभाजी देवकर, वैभव दंदाडे,तनुजा सिताप, कार्यालय अधीक्षक जानबा कांबळे.नगर अभियंता प्रवीण बैले, जन संपर्क अधिकारी अस्मिता निकम, लेखापाल अभिलाशा नेरे, दर्शन वेळापूरे,पराग डोंगरे,चिदानंद सर्वगोड हे उपस्थित होते.
,