Uncategorized

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक विश्लेषण…

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकिचा निकाल लागल्या नंतर अनेक गमतीदार विश्लेषण पुढे आली आहेत.हि निवडणूक भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, अजित पवार विरुध्द देवेंद्र फडणवीस यांच्यातील असल्यापासून ते महाविकास आघाडी ला लोक वैतागते ते मोदी व भाजप कारभार लोकांना आवडला इथपासून ते विठ्ठल कारखान्याच्या कारभाराचा हा परिणाम असल्याचे काहीनी विश्लेषण केले आहे.पण वास्तव जे आहे त्याचे ही विश्लेषण केले पाहिजे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक लागल्यानंतर परिचारकगट(पांडुरंग परिवार)व समाधान आवताडे गट(दामाजी परिवार)एकत्र आले व त्यांनी भालके गट(विठ्ठल परिवार) यांचे समोर आव्हान निर्माण केले.मतदार संघात या तिन गटाचेच प्राबल्य आहे. बाकी पक्ष वगैरे गौण बाब आहे.या गटाला सोडून ज्या पक्षाने निवडणुका लढविल्या त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
यापुर्वी तिरंगी लढतीत दिवंगत सुधाकरपंत परिचारक ५वेळा निवडून आले. तर दिवंगत भारतनाना भालके ३ वेळा निवडून आले.हा इतिहास आहे. त्यामुळे यावर्षी तिरंगी लढत होऊ द्यायची नाही या हेतूने पांडुरंग परिवार व दामाजी परिवार यांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचे ठरवले. भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली. तर भगिरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. पक्षिय कर्तव्य म्हणुन पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी मतदार संघात येऊन दोन्ही उमेदवाराचा प्रचार प्रसार केला.याचा नेमका किती मतदारावर परिणाम झाला हा संशोधनाचा विषय ठरेल.
मागील निवडणुकिचा विचार केला तर आवताडे यांना दोन्ही गटाची मते एकत्र केली तर ४०हजार मताचे लिड निश्चितच मिळणार असे चित्र होते.तर भगिरथ भालके यांना हे लिड कमी करुन आहे ही जागा टिकविण्याचे आव्हान होते.तर हि जागा खेचून आणायचे आव्हान समाधान आवताडे यांचे समोर होते..आ.प्रशांतराव परिचारक ,उमेशराव परिचारक यांचे नेटके नियोजन,बुथ लेवल पर्यत असणाऱ्या कार्यकर्त्याचे जाळे,नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य कारखाना, बँकेचे संचालक, विविध संस्थेचे पदाधिकारी यांचा मतदाशी असणारा संंपर्क तसेच समाधान आवताडे यांच्या ताब्यात असणाऱ्या संस्थचे संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी संभाळलेली प्रचार यंत्रणा प्रत्येक मतदारापर्यंत केलेला संपर्क याचा योग्य असा परिणाम झाला.व समाधान आवताडे यांना१,०९३९० मते मिळाली. पण अपेक्षेसारखे मतदान न मिळता ३७३३मतानी काठावर समाधान आवताडे यांचा विजय झाला. तर भगीरथ भालके यांचेकडे अडचणीत असणाऱ्या विठ्ठल कारखान्यांची यंत्रणा, मतदारांची सहानुभूती, अपुरी कार्यकर्त्यांची फौज ,तुटीपुंजी यंत्रणा जी शेवटच्या मतदारा पर्यंत पोहचू शकली नाही. तरीही १,०५७१७ मतदान झाले.पंढरपूर भागातुन २/३हजाराचे लिड मिळाले असते तर चित्र वेगळे असते .इतर१७ उमेदवार ११५२१मते मिळवू शकले. आपली अनामत रक्कम वाचवू शकले नाहीत. पण ते उभा राहिले नसते तर निकालाचे आणखी वेगळे चित्र दिसले असते. शेवटी विजय हा महत्वाचा असतो.तो विजय पांडुरंग व दामाजी परिवारांनी मिळवला व समाधान आवताडे विजयी करुन हि जागा खेचून आणली हे वास्तव मान्य केले पाहिजे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close