सामाजिक चळवळीमध्ये काळानुरूप बदलाची गरज–प्रा.सुभाष वायदंडे
पुरोगामी संघर्ष परिषद कोल्हापुर नुतन पदाधिकारी निवडी प्रसंगी व्यक्त केले विचार


पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी (ग्रामीण)अमोल सोनावळे यांना निवडीचे पत्र देताना संस्थापक अध्यक्ष प्रा सुभाष वायदंडे, स्वाती सौंदडे कोल्हापूर (वरिष्ठ)जिल्हा अध्यक्ष प्रकाश वायदंडे, शिवाजी सकटे इत्यादी.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
इस्लामपूर:- उपाशी पोटाने आणि फाटक्या कपड्यानिशी सामाजिक चळवळ चालवून प्रबोधन करण्याचे दिवस संपले असून सामाजिक चळवळ चालवत असताना व समाजाचे वैचारिक प्रबोधन करत असताना काळानुरुप चळवळीमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे मत पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी व्यक्त केले ते इस्लामपूर या ठिकाणी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या पदाधिकार्यांच्या निवडी प्रसंगी बोलत होते.
प्रा. वायदंडे पुढे बोलताना म्हणाले वाडवडीलांचे पराक्रम पुन्हा पुन्हा फक्त उघळत बसून काही उपयोगाचं नाही त्याच्यातून प्रेरणा घेणे महत्त्वाचे आहे.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी अमोल सोनावळे मलकापूर तालुका शाहूवाडी यांना प्रा. सुभाष वायदंडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वाळवा तालुक्याचे अध्यक्ष सरपंच शिवाजीराव सकटे यांनी केले यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश वायदंडे, पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा सौ.स्वाती सौंदडे, शाहुवाडी तालुक्याच्या अध्यक्षा सौ. रेणुका सोनावळे ,कोल्हापूर जिल्ह्याचे युवकचे संपर्कप्रमुख दीपक शिंगे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.






