सौ.ज्योती शेलार यांना “आदर्श शिक्षीका “पुरस्कार जाहीर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पुणे :-निराधारांना आधार देणा-या सौ. ज्योती नितिन शेलार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोलवड येथे शिक्षीका यांची पंचायत समिती जुन्नर मार्फत” आदर्श शिक्षिका” म्हणून निवड झाली आहे. . २००१ साली सर्वप्रथम शिक्षणसेवक म्हणून त्या बीड गेवराई येथील काठोडा तांडा या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बीड रूजू झाल्या. ५ वर्ष तेथे सेवा देत पुढे त्यांची बदली शिवजन्मभुमी अर्थात जुन्नर तालुक्यातील आणे या गावी झाली. आणेकरांच्या विद्यार्थ्यांना त्यांनी ११ वर्ष ज्ञानदानाचे धडे दिले. २०१९ साली त्यांची बदली शिवजन्मभुमीतच धोलवड गावात झाली व आजतागायत येथेच त्या कार्यरत आहेत. शिक्षीका म्हणून एकपात्री भुमिकेत न राहता त्यांनी सामाजिक कार्यात वेगळाच ठसा उमटवून समाजात एक आदर्श निर्माण केला. शिक्षक म्हणून सशक्त माणुसकी असलेली माणसं जपणारी पिढी घडविण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात, यामुळेच वेळोवेळी शाळेमध्ये अनेक संस्कारक्षम उपक्रम राबविण्यात त्या अग्रेसर असतात. आज्जी पूजन, असेल आणि मातृपुजन असेल, मुलांना लहापणापासूनच आज्जी बाबांचा आदर कसा करावा त्यांचें आशिर्वाद मिळविण्यासाठी काय करावे, शिक्षण घेऊन चांगला माणूस घडविण्यावर विशेष भर देणे अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडुन आत्मसात करण्यासारख्या आहेत. त्यांची पंचायत समिती जुन्नर मार्फत आदर्श शिक्षिका म्हणून निवड झाली याबद्दल अनेक हितचिंतकानी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. सा. जोशाबा टाईम्स व वेब न्यूज पोर्टल चे वतीने हार्दिक शुभेच्छा.