विठ्ठल साखर कारखान्याची निवडणूक लवकरच होणार-अभिजीत पाटील
सहकार मंत्र्यांचे सहकारी निवडणुक प्राधिकरण यांना सुचना

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:- राष्टवादीचे नेते शरद पवार यांना भेटून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या परस्थीतीवर चर्चा करुन सत्ताविस हजार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणे महत्वाचे असुन त्वरीत निवडणुक नाही घेतली तर कारखान्यावर जप्ती येऊ शकते त्यामुळे निवडणुक घेण्याची विनंती केल्याने त्यांनी तातडीने निर्णय घेण्याची सुचना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना केली..त्याची दखल त्वरीत घेऊन त्यांनी राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण मुदत संपलेल्या साखर कारखान्याची निवडणुक प्रक्रिया नियमानुसार त्वरीत सुरु करण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यानुसार येत्या पंधरा दिवसात निवडणुका जाहिर होतील.अशी माहिती डिव्हिपी परिवाराचे सर्वैसर्वा अभिजीत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आपण विठ्ठल कारखान्याच्या सर्व सभासदाशी भेटून निवडणुक लढविण्याची रणनीति तयार करणार असुन प्रसंगी स्वतंत्र पँनल उभा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.चार साखर कारखाना चालवून फायद्यात आणल्याने विठ्ठल चालविण्याबाबत मला आत्मविश्वास निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांची उसबिले,कामगारांचा पगार,व टप्प्याटप्प्याने कर्ज फेड करुन प्रसंगी माझ्या इतर कारखान्यावर कर्ज काढून कारखान्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त करुन देणे हा आपला उद्देश आहे.याबाबत सर्व शेतकरी सभासदांच्या भेटी सुरु असुन १३/१४हजार सभासदांचा संपर्क केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.