Uncategorized
छाया भास्कर बंगाळे यांचे दुःखद निधन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-जेष्ठ साहित्यिक प्रा.भास्कर बंगाळे यांच्या पत्नी छाया भास्कर बंगाळे यांचे नुकतेच ह्रदयविकाराने दुःखद निधन झाले मृत्युसमयी त्यांचे वय ५६वर्ष होते.त्यांचा अंत्यविधी अजनसोंड ता.पंढरपुर येथे संपन्न झाला.यावेळी समाजातील,गावातील व साहित्य क्षेत्रातील तसेच चळवळीतील अनेक जण मोठ्या सख्येंने उपस्थित होते.
त्यांचे पश्चात पती,मुलगा,तीन मुली,सुन,जावई नातवंडे असा परिवार आहे. विवीध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून व भ्रमणध्वनी द्वारे भास्कर बंगाळे सर यांचे सांत्वन केले असुन दिवंगत छाया बंगाळे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली आहे.