सर्वच क्षेत्रात महिलांना ५०% टक्के आरक्षणाची गरज–सुकेशिनी साठे

पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने सवादे (ता. कराड) या ठिकाणी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी सौ सुकेशिनी साठे ,सीमा साठे, कुसुम साठे इत्यादी
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सवादे (ता. कराड)- स्त्रियांना जर खऱ्या अर्थानं स्वावलंबी बनवायचे असेल तर विकासाची सत्ता स्त्रीच्या हातात असली पाहिजे आणि त्यासाठी स्त्री ही राज्यकर्ती बनली पाहिजे म्हणून इतर क्षेत्राप्रमाणे स्त्रियांना राजकीय क्षेत्रामध्ये ५० टक्के आरक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कराड तालुक्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. सुकेशिनी साठे यांनी केले. त्या सवादे (ता.कराड)या ठिकाणी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
स्वागत तालुका उपाध्यक्षा सौ. सीमा साठे यांनी केले तर प्रास्ताविक सौ कुसुम साठे यांनी केले.
यावेळी आशाताई सागरे, वैशाली सागरे ,दीपिका साठे वैशाली साठे, शोभा साठे बबूताई सागरे ,उषाताई सागरे, शकुंतला सागरे, मनीषा सागरे ,अनिता साठे, पुनम साठे ,वर्षा साठे, वंदना साठे, आशालता भोसले, शोभा साठे, सविता साठे, जयश्री सागरे ,शीतल साठे, नंदा थोरात इत्यादी महिला उपस्थित होत्या.
शेवटी आभार भारती साठे यांनी मानले.