संपूर्ण राज्यभरात मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेड पुनर्गठन-पुनर्बांधणीच्या बैठकांचा झंझावात सुरु ..

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
संपादक-श्रीकांत कसबे
सकाळच्या सत्रात सोलापूर जिल्हा उत्तर विभागाच्या पुनर्गठन-पुनर्बांधणीसाठी सावंतवाडी ता.उत्तर सोलापूर याठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमात संभाजी भोसले यांची सोलापूर उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून तर श्याम कदम यांची सोलापूर महानगराध्यक्ष पदावर फेरनियुक्ती करण्यात आली. सोबतच सावंतवाडी व अकोलेकाटी या ठिकाणी ग्रामशाखांचे उद्घाटन करण्यात आले.
दुपारच्या सत्रात सोलापूर जिल्हा पंढरपूर विभागाच्या पुनर्गठन-पुनर्बांधणीचा कार्यक्रम पंढरपूर येथील मोरारजी कानजी सभागृहात पार पडला. यावेळी किरण जाधव यांची सोलापूर जिल्हा पंढरपूर विभागाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यासोबतच पुणे विभाग तसेच पंढरपूर व सांगोला तालुका कार्यकारिणीतील निवडी करण्यात आल्या.
सायंकाळच्या सत्रात पंढरपूर विभागातील मंगळवेढा तालुका पुनर्गठन-पुनर्बांधणी कार्यक्रम पार पडला. यावेळी आंनदा मोरे यांची मंगळवेढा तालुकाध्यक्ष तर शुभम सावंत यांची मंगळवेढा शहराध्यक्ष म्हणून नवनियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष व सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अमोल काटे, माजी प्रदेश कार्याध्यक्ष अमरजीत पाटील, संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे, प्रदेश संघटक प्रदीप कणसे, पुणे विभाग अध्यक्ष दीपक वाडदेकर, कोकण विभाग अध्यक्ष सचिन सावंत देसाई, नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील शिंदे, नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष गणेश पाटील शिंदे, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव, संभाजी ब्रिगेड माहिती तंत्रज्ञान कक्षाचे प्रमुख अनिल माने, पंढरपूर शहराध्यक्ष लखन थिटे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.