Uncategorized

26नोव्हेंबर रोजी फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे वतीने “संविधान दिन “साजरा होणार!

"भारतीय संविधान" या विषयावर व्याख्यानचे आयोजन

पंढरपूर :-

फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, चे वतीने  भारतीय संविधान दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकीलीस दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी शतक पूर्ण झाले निमित्त रविवार दि. २६ नोव्हेंबर रोजी      डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक,  येथे सकाळी १० वा     फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे वतीने “संविधान दिन “साजरा होणार असून यावेळी .फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, पंढरपूर व पंढरपूर वकील संघाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन व सामुदायिक भारतीय संविधान उद्देशिका वाचन  व प्रबोधनात्मक व्याख्यानाचे   आयोजन करण्यात आलेले आहे.    सकाळी ११-०० वा.   भारतीय संविधान  या विषयावर – प्रा. डॉ. किशोर खिलारे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांचे व्याख्यान आयोजित केले आहें. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  अॅड. अर्जुन पाटील (अध्यक्ष, बार असोसिएशन, पंढरपूर) हें उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान .सुनिल वाघमारे (अध्यक्ष, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच) हें भूषविणार आहेत.    यावेळी  पंढरपूर बार असोसिएशनचे सर्व सन्माननिय वकील यांचा सन्मान केला जाणार आहें.

वरील कार्यक्रमास विचारमंचाच्या सदस्यांनी व सर्व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी उपस्थित असे आवाहन फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच चे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी केले आहें.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close