मातंग समाज अन्याय अत्याचार प्रकरणी जिल्हा मोर्चाचे नियोजन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
संपादक-श्रीकांत कसबे
पंढरपुर-माळेवाडी बोरगाव येथे मातंग समाजातील मयत व्यक्तिस अंत्यविधी साठी स्मशानभुमीत जाण्याचा रस्ता जाणिवपूर्वक अडवुन मयताची विटंबना केली याप्रकरणातीलदोषी व्यक्ति वर अद्याप कार्रवाई केली नाही. याचे निषेधार्थ सोलापुर जिल्ह्यातील मातंग समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे आयोजीत केलाआहे.
नियोजनाची बैठक संत गाडगे महाराज मठ पंढरपुर येथे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब वाघमारे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी संयोजक युवराज पवार (अध्यक्ष मातंग समाज सोलापुर)यांनी जिल्हा दौरा सूरू केला असुन आज ते पंढरपुर येथे आले होते.त्यांनी जिल्हयात आतापर्यंत मातंग समाजावर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला ..यापैकी एका ही आरोपीवर कारवाई झाली नसुन प्रशासनाचा ढिचाळ कारभार असल्याचे नमुद केले असुन सर्व विषय घेऊन राज्याचे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे व विवीध संघटनेतील मान्यवरांचे मार्गदर्शनाखाली हा मोर्चा निघणार असल्याचे स्पष्ट करुन लवकरच तारीख जाहीर करु असे सांगीतले.
यावेळी माजी नगरसेवक अंबादास वायदंडे, माजी नगरसेवक उमेश पवार,साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे संघटनेचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक महेश साठे,दलित महासंघ तालुकाध्यक्ष अमोल खिलारे, राष्टवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हा सरचिटणीस जयसिंग मस्के,सामाजिक कार्यकर्ते अँड.किशोर खिलारे, अमोल खिलारे सर,धनंजय वाघमारे, अमित अवघडे,कबिर देवकुळे,आण्णासाहेब वायदंडे ग्रा.प.सदस्स देगाव,समाधान वायदंडे, अजनसोंड, अजित खिलारे,दतात्रय लोंढे,रवी वाघमारे आदी उपस्थित होते.