Uncategorized

एमएएच-एमबीए-सीईटी २०२३ करिता ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू

स्वेरी मध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

छायाचित्र-स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, स्वेरी चिन्ह व एमबीए चे विभागप्रमुख प्रा. करण पाटील

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर– शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये एमबीए प्रवेशा करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एमएएच-एमबीए-सीईटी २०२३ या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया गुरुवार, दि.२३ फेब्रुवारी, २०२३ पासून ते शनिवार, दि.०४ मार्च २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. पदवी उत्तीर्ण झालेल्या व पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एमएएच एमबीए-सीईटी २०२३ साठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा स्वेरीतील एमबीए विभागात उपलब्ध असल्याची माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.पदव्युत्तर पदवी असलेल्या एमबीए च्या प्रवेशाकरीता अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणार्‍या एमएएच-एमबीए-सीईटी २०२३ ही परीक्षा येत्या १८ व १९ मार्च २०२३ या दोन दिवशी होणार आहे. सदर परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया गुरुवार, दि.२३ फेब्रुवारी २०२३ पासून सुरु झाली असून ही प्रक्रिया शनिवार, दि.०४ मार्च २०२३ पर्यंत चालणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी प्रवेश परीक्षा नोंदणी शुल्क रु.१०००/- व अनुसूचित जाती-जमातीसाठी रु.८००/- एवढे असून हे नोंदणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. या सीईटी परीक्षांचे फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडे आयडेंटी साईज एक रंगीत फोटो, एटीएम कार्ड अथवा ऑनलाईन बँकिंगचा लॉगीन आयडी आणि त्याचा पासवर्ड या बाबी आवश्यक असणार आहेत. या प्रवेश परीक्षेच्या संदर्भात अधिक माहीतीसाठी शासनाच्या https://mbacet2023.mahacet.org या संकेत स्थळावर तसेच स्वेरी अभियांत्रिकीच्या एमबीए चे विभागप्रमुख प्रा.करण पाटील (मोबा. नंबर–९५९५९२११५४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close