छत्रपती शासन महिला विकास क्रे. सोसायटीने प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढली—राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे

पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यांनी छत्रपती शासन महिला विकास क्रेडिट सोसायटीला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी छत्रपती शासनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. दिव्याताई मगदूम व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
इचलकरंजी:- छत्रपती शासनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. दिव्याताई मगदूम यांनी महिलांचा आर्थिक विकास करण्यासाठी व महिलांना आर्थिक क्षेत्रात स्वावलंबी बनण्यासाठी छत्रपती शासन महिला विकास क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करून व तीन हजार पेक्षा जास्त सभासद संख्या नोंदवून एक वर्षाच्या अल्पावधीतच एक कोटीपेक्षा ज्यादा टर्न ओव्हर करून आर्थिक पुरवठा केल्याने प्रस्थापितांची एक प्रकारे मक्तेदारीच मोडल्याचे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष संघर्षनायक प्रा. सुभाष वायदंडे यांनी केले.
प्रा. सुभाष वायदंडे यांनी इचलकरंजी येथील छत्रपती शासन या सामाजिक संघटनेचे सदिच्छा भेट देऊन सामाजिक चळवळीवर व भविष्यात पुरोगामी संघर्ष परिषद आणि छत्रपती शासन यांच्या सामाजिक आंदोलनाबद्दल चर्चा केल्यानंतर छत्रपती शासन महिला विकास क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला भेट दिल्यानंतर सोसायटीच्या चेअरमन दिव्याताई मगदूम यांनी सोसायटीची स्थापना व वाटचाल याबद्दल माहिती दिली.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व छत्रपती शासन चे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.