महादेव वाघमारे मृत्यू प्रकरणी सकल मातंग समाजाचा निषेध मूक मोर्चा

‘जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-कासेगाव ता. पंढरपूर येथें दोन कुटुंबातील किरकोळ भांडणातील संशयित आरोपी महादेव दादा वाघमारे यांचा न्यायालयीन कोठडीत असताना पोलीस मारहाणीत त्याला अती त्रास झालेने सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता मृत्यू झाला. या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित पोलीस, पोलीस अधिकारी, जेलर यांचेवर गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी सकल मातंग समाजाचे वतीने तहसील कार्यालय येथे मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतिवीर लहुजी वस्ताद चौक येथून या मोर्चास सुरुवात झाली. यावेळी साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे युवक संघटना, बहुजन रयत परिषद, दलित महासंघ, लहुजी शक्ती सेना, दलित स्वयंसेवक संघ, बहुजन समता पार्टी, डेमोक्रोटीक पार्टी ऑफ इंडिया, एन. डी. एम. जे. आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी तानाजी रणदिवे सुस्ते, अशोक पाटोळे रोपळे, जयसिंग मस्के खेड भाळवणी, सत्यवान देवकुळे गार्डी, डॉ संजय लोखंडे मोडलिंब,संजय आडगळे(तालुकाध्यक्ष साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे युवक संघटना )माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे, ऍड. किशोर खिलारे, (शहराध्यक्ष बहुजन रयत परिषद )नानासाहेब वाघमारे (दलित मित्र )पंढरपूर, इंजि आण्णासाहेब वायदंडे देगांव,सागर लोखंडे (लहुजी शक्ती सेना माळशिरस, ) धनाजी शिवपालक ( एन. डी. एम. जे. जिल्हा उपाध्यक्ष) सुनील अवघडे (जिल्हाध्यक्ष दलित महासंघ बार्शी)राजू धडे, दलित स्वयंसेवक प्रदेशाध्यक्ष) समाधान आवळे, युवराज पवार( मातंग समाज अध्यक्ष सोलापूर ) माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपल्या भावना व्यक्त करुन मयत महादेव वाघमारे यांचे कुटुंबास न्याय मिळावा अशी मागणी केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून वरिष्ठ पातळी वरून दोषीवर कारवाई करण्याचे आदेश द्यावे अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
या मोर्चाचे नेतृत्व महिला भगिनीने केले व मयत महादेव वाघमारे यांची पत्नी लक्ष्मीबाई वाघमारे व वडील दादा वाघमारे यांचे हस्ते तहसीलदार सुनील बेल्हेकर यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनतील प्रमुख मागण्या
(१) मयत महादेव दादा वाघमारे यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणाची सी.आय. डी. चौकशी व्हावी.
(२) अटक करून त्यांना मारहाण करणाऱ्या देवकर व संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
(३) न्यायालयीन कोठडीमध्ये असताना वेळेत उपचारासाठी दाखल केले नसल्यामुळे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याची चौकशी करून कायदेशीर कार्यवाही व्हावी.
(४) महादेव वाघमारे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
(५) महादेव वाघमारे यांच्या कुटूंबियास शासकीय योजनेतून २५,००,०००/- रुपयांची आर्थिक मदत तात्काळ यावी,
(६) दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतून चार एकर जमीन देवून महादेव वाघमारे यांच्या कुटूंबियांचे पुनर्वसन करण्यात यावे.
(७) महादेव वाघमारे यांच्या कुटुंबियांतील एका व्यक्तीस शासकीय सेवेत नोकरी देणेत यावी. वरील सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून योग्य ती कार्यवाही व्हावी.
यावेळी माजी नगरसेवक अंबादास वायदंडे, माजी नगरसेवक उमेश पवार, माजी नगरसेवक महेश साठे, माजी नगरसेवक रमेश कांबळे, आण्णा भाऊ साठे युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब अवघडे, माजी नगरसेविका सुनिताताई अवघडे,माजी नगरसेवक खंडू खंदारे,(मंगळवेढा ) अजित खिलारे, दादा वाघमारे,अर्जुन खिलारे ,सोहम लोंढे, (डीपीआय प्रदेश युवाध्यक्ष) बहिरु लोंढे,देविदास कसबे, (लहुजी शक्ती सेना प. महाराष्ट्र )मुकुंद घाडगे,(तालुकाध्यक्ष लहुजी शक्ती सेना )समाधान वायदंडे,धनंजय साठे, नाना लोखंडे, दिनेश साठे,भीमराव वाघमारे दत्ता खिलारे, जीवन कांबळे, शाहीर नंदकुमार पाटोळे,सुधाकर मस्के,(DPI तालुकाध्यक्ष )विठ्ठल वाघमारे, राजू देवकुळे अजय तुपसौन्दर, पांडुरंग खिलारे,(जिल्हाध्यक्ष बहुजन समता पार्टी ) अमोल खिलारे, विशाल तुपसौन्दर, नेताजी वाघमारे, संजय लोखंडे,यांचेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.