Uncategorized

संविधान दिनानिमित्त भिमशक्ती मंडळाचे वतीने “जयभीम”चित्रपट दाखविण्यात येणार

संयोजक उमेश सर्वगोड यांनी दिली माहिती

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

          श्रीकांत कसबे

पंढरपूर:-२६नोव्हेबर “संविधान दिन” भिमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रिडा मंडळाचे वतिने विविध उपक्रमाचे आयोजन केले असुन सांयकाळी ८वाजता “जयभिम”चित्रपट दाखविणार असल्याची माहिती संयोजक उमेश सर्वगोड यांनी दिली.

सायंकाळी ७ वाजता डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पुजन विक्रम कदम साहेब उपविभागीय पोलीस अधिक्षक पंढरपूर,आमदार समाधानदादा आवताडे, युटोपियन साखर कारखान्याचे चेअरमन उमेशराव परिचारक या मान्यवरांचे हस्ते होणार असुन त्यानंतर संविधावाचे उद्देशिका वाचन केले जाणार आहे .भारतिय संविधानाच्या माध्यमातुन आदिवासी समाजाला न्याय मिळवुन देणारे अँडव्होकेट चंद्रू,कर्तव्यदक्ष व प्रामाणिक पोलीस अधिकारी व स्वाभीमानी संगीनी….यांच्या सत्यकथेवर आधारित  तामिळनाडुत “जयभीम” चित्रपट निर्माण झाला असुन अन्याय, अत्याचार, जातीयवाद याचेवर जळजळीत भाष्य करणारा हा चित्रपट ५भाषेसह भारतात प्रदर्शित झाला असुन अनेक चित्रपटाचे रेकार्ड मोडले आहेत.पंढरपूर येथील थिएटर मध्ये अद्याप हा चित्रपट प्रदर्शित झाला नसल्यामुळे नागरिकांना हा चित्रपट पहाता यावा म्हणुन हा चित्रपट दाखविण्याचे प्रयोजन केले आहे…सांगोला रोड भिमशक्ती चौक येथे हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.तरी सर्व नागरिकांनी हा चित्रपट आवश्य पहावा असे आवहान उमेश सर्वगोड ,सुधिर सर्वगोड, अक्षय कदम यांनी एक पत्रकाद्वारे केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close