पंढरीच्या विशाल सुरवसे ने पटकाविला बॉडी बिल्डर स्पर्धेत ज्यु..महाराष्ट्र श्री किताब
२२फेब्रुवारी रोजी पाँंडेचरी येथे होणाऱ्या मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी निवड

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर- महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशने नवी मुंबई मध्ये आयोजित केलेल्या बॉडी बिल्डर स्पर्धेत पंढरपूरच्या विशाल अशोक सुरवसे या युवा बॉडी बिल्डरने ज्युनियर महाराष्ट्र श्री हा मानाचा किताब पटकाविला आहे.
या स्पर्धेत विशालने बाजी मारल्याने त्याची निवड आता मिस्टर इंडियासाठी झाली आहे. येत्या २२ फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा पॉंडेचरी येथे होणार आहे. नवी मुंबई येथे झालेल्या स्पर्धेत दोनशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये विशालने आपले शरीरसौष्ठव कला सादर करून प्रथम क्रमांक पटाकाविला. मिस्टर इंडीया व इतर राष्ट्रीय स्पर्धेस निवड होण्यासाठी ही स्पर्धा महत्वाची मानली जाते. लहानपणापासून व्यायामाची आवड असलेला विशाल गेल्या तीन वर्षापासून या स्पर्धेची तयारी करीत होता. पंढरपूर मधील कंडरे . फिटनेस क्लब व माय जिम मध्ये विशालने सराव केला. विशेष म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण घेत विशालने आपली ही आवड जोपासली आहे.
सोमवारी विशालचे पंढरीत आगमन होणार असून त्याचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. दरम्यान येथील प्रसिध्द उद्योजक पांडुरंग दामोदर सुरवसे यांचा विशाल हा नातू असून अशोक सुरवसे यांचा मुलगा आहे. या यशाबद्दल त्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार हरिष पिंपळे, आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह बुरूड समाजाचे नेते राजेंद्र सूर्यवंशी, माजी नगरसेवक मनोज सुरवसे, विजय सुरवसे, मोहन सुरवसे, नामदेव साळुंखे, बाळासाहेब साळुंखे आदींनी अभिनंदन केले आहे.