ब्राह्मणांचे कसब,गुलामगिरीत दाखविलेले वास्तव आजही नव्या बदलल्या स्वरूपात अस्तित्वात–सुधीर मागाडे सर
महात्मा फुले लिखित पुस्तकावर व्याख्यान संपन्न!


जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :- महात्मा फुले यांनी 150 वर्षांपूर्वी ब्राम्हणचे कसब, व गुलामगिरी या पुस्तकाचे लिखाण करून त्या द्वारे शूद्र अतिशूद्र यांची देव,धर्म, धर्मग्रन्थचा आधार घेऊन ब्रम्हणांनी आपले कसब (कौशल्य )वापरून कसे गुलामीत ठेवले याचे तपशीलवार वर्णन केले आहें. तर गुलामगिरी मध्ये त्यांनी देवावतारावर मार्मिक सत्य सांगितलेले आहें हें वास्तव आज ही अस्तित्वात आहें पण त्याचे स्वरूप बदललेले आहें. हें ओळखणे गरजेचे आहें असे विचार सुधीर मागाडे (सल्लागार, फुले शाहू आंबेडकर विचारमंच )यांनी व्यक्त केले. ते राष्ट्रपिता महात्मा फुले यांचे स्मृती दिनानिमित्त”ब्राम्हणचे कसब व गुलामगिरी “ या विषयावर 3डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुनील वाघमारे (अध्यक्ष,फुले शाहू आंबेडकर विचारमंच)
पुढे बोलतांना सुधीर मागाडे सर म्हणाले की, येथील शेटजी, भटजी, यांनी शूद्र अतिशद्र यांना धार्मिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीची दारे बंद केली. व धार्मिक गुलामगिरी लादली याचे अभ्यासपूर्ण विवेचन वरील पुस्तकात केले आजही शूद्र, अतिशूद्र (sc, st, obc ) हें वरील सर्व क्षेत्रात मागास राहिला असून यांचे शोषण करणारी व्यवस्था आजही सक्रिय असल्याचे दिसत आहें. याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहें.

अध्यक्षीय भाषणात सुनील वाघमारे म्हणाले की, गुलाम करणाऱ्यांचा व गुलामांचा एकच धर्म नसतो. शोषण करणारे व शोषित एकाच धर्माचे नसतात यावर महात्मा फुले यांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले असून आजही जागृती करणाऱ्या पेक्षा संभ्रमित करुन sc/st/obc यांना गुलामीत ठेवणारी यंत्रणा मोठया प्रमाणात कार्यरत आहें. त्यामुळे प्रबोधनचा रेटा वाढवून वरील वर्ग एकसंघ करून ब्राह्मणवादी व्यवस्था नष्ट करणे ही आपल्या महापुरुषांनी दिलेले उद्दिष्टे आहेत. हें आपण विसरून चालणार नाही. त्या साठी नव्या पिढीला महापुरुषांचे विचार समजावे म्हणून महात्मा फुले लिखित “ब्राम्हणचे कसब व गुलामगिरी “या पुस्तकावर व्याख्यान आयोजित केले आहें.

कार्यक्रमाचे सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व सामूहिक त्रिशरण, पंचशील ग्रहण करण्यात आले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. किशोर खिलारे यांनी केले तर सूत्रसंचालन दत्तात्रय पाटोळे सर यांनी केले. शेवटी आभार संतोष सर्वगोड यांनी मानले.




