तावशी येथे तातडीने कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी युवक वर्गाची मागणी
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
तावशी : गेल्या महिन्यापासून तावशी परिसरात कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे कोविड सेंटर तातडीने सुरू करावे किंवा खाजगी विनामूल्य कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी युवानेते श्री. अनिल यादव , तात्या यादव , रवि रणदिवे सर , आण्णा मासाळ आणि सहकारी युवकांच्या वतीने तावशी ग्रामपंचायत कडे आज (दि.०३ मे, २०२१) रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्हाभर कोरोनाचे वाढते प्रमाण गंभीर असून पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातही त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. तावशी परिसरात तर खूपच भयानक परिस्थिती झालेली आहे. गावातील पाच ते सहा युवक आणि ज्येष्ठ नागरिक महिनाभरात कोरोनाने मृत्युमुखी पडले आहेत.तर सुमारे शंभराहून अधिक ऍक्टिव्ह कोरोनाग्रस्त गावात आहेत. त्यामुळे तावशी येथे तातडीने कोविड सेंटर सुरू करावे व त्या ठिकाणी सर्व सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
मा. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांनी ५००० पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावात कोविड सेन्टर तातडीने चालू करावे असे आदेश दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी संबंधित प्रशासनाने अद्यापपर्यंत केलेली नाही. त्यामुळे नागरिकांतून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.
यावेळी उपस्थित सर्व युवकांनी स्वतःच्या खर्चाने व लोकवर्गणीतून खाजगी विनामुल्य कोविड सेंटर चालू करण्याची तयारी दर्शविली असून त्यास ग्रामपंचायतची परवानगी मिळावी अशी मागणी केली.
या प्रसंगी अनिल यादव , तात्यासाहेब यादव, हनुमंत आसबे, रवी रणदिवे, कृष्णा मासाळ, अमोल कुंभार, दत्ता सातपुते, शेखर कोपे आदींसह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.