Uncategorized

ब्रह्माकुमारी सेवा केंद्रातर्फे कीर्तनकार, महाराज, मठाधिपती यांचे स्नेह मिलन व सत्कार समारंभाचे आयोजन

गीता महाभारत या भारतीय संस्कृतीच्या आधारस्तंभ ग्रंथाचा सखल अभ्यासिका राजयोगिनी बी. के.उषा दीदीजी चे पंढरपूर मध्ये 21 डिसेंबर रोजी आगमन प्रित्यर्थ विविध कार्यक्रम

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे

पंढरपूर :- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मुख्यालय माउंट आबू येथून वरिष्ठ राजयोग शिक्षिका राजयोगिनी  बी. के. उषादीदी या 21 डिसेंबर रविवारी पंढरपूर मध्ये येत आहेत.  उषा दीदी यांनी रामायण आणि भगवद्‌गीता या भारतीय संस्कृतीच्या आधारस्तंभ असलेल्या ग्रंथाचा सखोल अभ्यास केला आहे या ज्ञानाचा आधुनिक जीवन व्यवस्थापन नेतृत्व विकास आणि वैयक्तिक परिवर्तन यांच्याशी सुंदर व सोप्या पद्धतीने केलेला संगम लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरतो. सेल्फ मॅनेजमेंट, स्ट्रेस फ्री लाईफ, पारिवारिक मूल्य यासारख्या विषयी भारतासह जगातील अनेक देशांमध्ये कार्यक्रम घेतले आहे.

त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनी हजारो लोकांनी मानसिक ताण, भीती, नकारात्मकता, व्यसन इत्यादीवर मात करून जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवले आहे.त्यांच्या हिंदी आणि इंग्लिश मधील राजयोग वर्ग व प्रवचने विविध टीव्ही चॅनेल्सवर क युट्युब वर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.

आध्यात्मिक व सामाजिक सेवेतील उत्कृष्ट मान्यवर सन्मान प्राप्त झाले आहेत. 2012 (भारतीय जनसंपर्क परिषद)मॉरल अवार्ड 2019 – थायलंड सरकार पीस मेडल थायलंड सरकार 2019

जि ओ डी पुरस्कार – 2019 (ग्लोबल अवॉर्ड डिग्नीटरिज अँड फिलाथ्रोपिस्टस.) लॉस, एजलीस, यू एस ए.

उषा दीदीची चे 20 डिसेंबर पासून सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यात स्थानीय ब्रह्माकुमारी सेवा केंद्रातर्फे विविध कार्यक्र ब्रह्माकुमारी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .
पंढरपूर 20 डिसेंबर संध्याकाळी उषा दीदी येणार आहेत. पंढरपूर ब्रम्हाकुमारी स्थानीय सेवाकेंद्र तर्फे स्थानीय सेवाकेंद्र कुंभार गल्ली, विरार दर्शन दिव्य कलादान या ठिकाणी 21 डिसेंबर रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून रेगुलर साधकांसाठी मेडिटेशन व आध्यात्मिक प्रवचनाचे आयोजन केले आहे.
9.00 वाजता मधील पंढरपूर क्षेत्रातील सर्व पंढरपूर श्रेष्ठ सर्व कीर्तनकार, महाराज, मठाधिपती इत्यादींचे स्नेह मिलन व सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे. यामध्ये पंढरपूर मधील 250 पर्यंत संतांना निमंत्रण दिले आहे. त्यानंतर 11.00 वाजता श्रीराम मठ, इसबावी येथे सर्व जनतेसाठी उषा दीर्दीजी चे प्रवचन श्रीमद् भगवद्‌गीता व महाभारताचा सार सुखमय जीवनाचा आधार या विषयावर ठेवण्यात आले आहे. दुपारी 4.00 वाजता इंजिनिअरिंग कॉलेज पंढरपूर स्वेरी येथे सर्व विद्यार्थी व स्टाफ साठी रोंगे सरांनी मेडिटेशन डे निमित्त उषा दीदीजी चे मार्गदर्शन आयोजित केले आहे.

तरी पंढरपूर शाखेच्या संचालिका उज्वलादीदी यांनी सर्व पंढरपूर शहर व शहरातील सर्व गावातील जनतेला 21 तारखेला रविवारी श्रीराम मठ येथील 11.00 वाजता च्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आव्हान केले आहे. प्रवेश विनामूल्य आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close