Uncategorized

प्रा. डॉ.. वामन निंबाजी साळवे यांना  घुमान साहित्य सभेचा संत नामदेव साहित्य पुरस्कार जाहीर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

इचलकरंजी :येथील प्रा. डॉ. वामन निंबाजी साळवे यांना नानक-साई  फाउंडेशन,घुमान साहित्य सभेचा नांदेडचा संत नामदेव साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत संस्थाध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी त्यांना पत्राद्वारे कळवले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई पुरस्कृत नानक-साई फाउंडेशनतर्फे ४ फेब्रुवारीला श्री ग्रंथ साहीब भवन (नांदेड) येथे होणाऱ्या संत नामदेव मराठी साहित्य संमेलनत त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. ते शिवाजी विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य व येथील व्यंकटेश महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.

 

:

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close