पंडित कांबळे यांच्या “पेटलेल्या शहराच्या कल्लोळात” या कवितासंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
धाराशिव : दिनांक 13/12/2023
पंडित कांबळे हे नगरपरिषद शाळा क्रमांक 14 धाराशिव येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची तीन कविता संग्रह, तीन बालकविता संग्रह, चार संपादित पुस्तके व एक समीक्षा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे.
देवकाई बापूरावजी बनसोड यांच्या स्मृतिप्रित्यार्थ देवकाही स्मृती प्रतिष्ठान आर्वी जिल्हा वर्धा द्वारा दिला जाणारा ,”देवकाई राज्यस्तरीय काव्य पुरस्कार”- 2023 हे जाहीर करण्यात आले आहेत. यात पंडित कांबळे यांच्या “पेटलेल्या शहराच्या कल्लोळात “या कवितासंग्रहाला द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. कसदार आशय, नवीन प्रयोग, कवितेची दमदार भाषाशैली, मानवी मूल्याचा अंतर्भाव, प्रखर सामाजिक जाणीव इत्यादी मुद्द्याला अनुसरून कवी प्रमोद नारायणे, कवी /समीक्षक प्रशांत ढोले, कवी गजलकार प्रीती वाडीभस्मे यांनी पारदर्शक व न्याय देणारे परीक्षण करून निकाल दिला आहे.
आर्वी जिल्हा वर्धा येथे २४ डिसेंबर 2023 रोजी न्यू रोशन सेलिब्रेशन हॉल, वर्धा रोड येथे माजी आ.अमरभाऊ काळे व कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी संजय इंगळे तीगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे असे कार्यक्रमाचे संयोजक प्रकाश बनसोड यांनी कळविले आहे .
यापूर्वी सा. जोशाबा टाईम्सचा साहित्य क्षेत्रातील “सद्धभावना पुरस्कार “पंडित कांबळे यांना देऊन गौरविण्यात आले आहें.