अँड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस खर्डी येथे व्रुक्षारोपनाने साजरा

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:-वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डी येथे वंचित बहुजन आघाडीचे पंढरपूर तालुका अध्यक्ष विनोद तोरणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सध्या संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असता ऑक्सिजन साठी लोक आपले प्राण गमावत आहेत आणि तरीही आज आपल्याकडे ऑक्सिजन ची कमतरता आहे. झाडांच्या कत्तली करुन पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे.याचे महत्त्व ओळखून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अँड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांची मदत करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम वंचित बहुजन आघाडी चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष नानासाहेब कदम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी विशाल चंदनशिवे, सिताराम वाघमारे, राजेंद्र रोंगे, अशोक चव्हाण व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते. शासनाने घालून दिलेल्या निर्देशाचे पालन करत हा कार्यक्रम संपन्न झाला.