Uncategorized
प्रा.शिवाजी वाघमारे यांचे जडणघडण आत्मचरित्र प्रेरणादायी– डॉ.राजेंद्र दास
"जडणघडण " आत्मकथेचा प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न

जेष्ठ साहित्यिक डाँ. राजेंद्र दास मनोगत व्यक्त करताना
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर –
प्रा.शिवाजी वाघमारे यांनी लिहिलेले जडणघडण हे आत्मचरित्र प्रेरणादायी आहे. त्यांच्या शैक्षणिक जीवन प्रवासाबरोबरच संघर्षमय जीवन जगत असताना त्यांनी माणसे जोडण्याचे काम केलेले आहे. रयत शिक्षण संस्था सातारामध्ये अध्यापनाचे काम करीत असताना त्यांनी सुट्टीची तमा न बाळगता सेवाभावी वृत्तीने विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील थोर साहित्यिक व विचारवंत डॉ.राजेंद्र दास यांनी केले.

जडणघडण या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ.राजेंद्र दास यांनी प्रा.शिवाजी वाघमारे सरांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक बा.ना.धांडोरे होते. यावेळी मंचावर ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे, डॉ.सुरेश शिंदे, डॉ.सारीपुत्र तुपेरे, डॉ.महेंद्र नगरे, विद्या विकास मंडळ करमाळ्याचे सचिव विलासराव घुमरे सर, डॉ.पी.के.नलावडे, प्रा.डॉ. वामन जाधव, ज्येष्ठ पत्रकार सिध्दार्थ ढवळे,श्रीकांत कसबे, जैनुद्दीन मुलाणी, सुनिल वाघमारे, माजी शिक्षणाधिकारी विष्णू सरगर, राजेश पवार, बाळासाहेब काळे, उत्तमराव जमदाडे, प्रा.भास्कर बंगाळे, शिवाजीराव सोनवणे, प्रा. D. N. कुंभार, राजेश पवार, प्रा. भारत गायकवाड, भिष्मा चांदणे, डॉ.दिपक वाघमारे, अमोल वाघमारे, प्रविण वाघमारे,बुध्ददेव वाघमारे, शशिकांत बनसोडे, संपादक क्रांती चिराग सांगोला इ.उपस्थित होते.

जेष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे मनोगत व्यक्त करताना
डॉ.सुरेश शिंदे यांनी आपल्या प्रभावी कवितांच्या माध्यमातून प्रा.वाघमारे सरांच्या जडणघडण आत्मचरित्राचे विस्तृत विश्लेषण केले. विलासराव घुमरे सरांनी साहित्यिक क्षेत्रातल्या लेखक व कवी या घटकांना नेहमीच प्रेरणा दिली आहे.

जेष्ठ साहित्यिक बा. ना. धांडोरे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना
अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी नवोदितांना व ज्येष्ठांचा सन्मान केला आहे. ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांनी आत्मचरित्र हे एकट्याचे नसते त्यात तत्कालीन परिस्थितीचे चित्रण असते अशा शब्दात जडणघडणया आत्मचरित्राचे लेखक प्रा.शिवाजी वाघमारे यांचा गौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक बा.ना.धांडोरे यांनी ज्याचे मन संवेदनशील असते, त्यानेच आत्मचरित्र लिहावे असे मत व्यक्त केले. यावेळी दयानंद कांबळे सांगली यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

विलास घुमरे मनोगत व्यक्त करताना
उपस्थितांचे स्वागत व सन्मान वाघमारे परिवाराच्या वतीने डॉ.दिपक वाघमारे, अमोल वाघमारे, प्रविण वाघमारे, बुध्ददेव वाघमारे,तेजस वाघमारे, सत्यवान वाघमारे, विशाल वाघमारे, स्वाती बुध्ददेव वाघमारे यांनी केला.

जेष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे मनोगत व्यक्त करताना
या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक प्रबुध्द विचाराचे मार्गदर्शक सुनिल वाघमारे यांनी आपल्या प्रभावी भाषा शैलीत प्रा.शिवाजी वाघमारे सरांच्या जीवन कार्याचा प्रवास सादर केला व उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साहित्यिक अंकुश गाजरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकांत कसबे यांनी केले.या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून प्रा.शिवाजी वाघमारे सरांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
