पुरोगामी संघर्ष परिषदेने जातीसह धर्माचेही बांध ओलांडले-संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे

राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे ,
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी व सत्कार प्रसंगी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे ,प्राचार्य बाळासाहेब साठे, अमोल महापुरे व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
कोल्हापूर :- पुरोगामी संघर्ष परिषदेने सामाजिक संघटनेत स्वतःचा वैचारिक धबधबा निर्माण करत असताना अन्यायाच्या विरोधात लढून टोकाची भूमिका घेत योग्य असलेला मुद्दा तडीस नेऊन समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम केलेलं आहे. अशा परिस्थितीत संघटन हे फक्त जातीपुरते मर्यादित न ठेवता सर्व जातींना सामावून घेत असताना धर्माचेही बांध ओलांडून अनेक धर्मांना संघटनेत सामील करून घेतल्यामुळे जातीसह धर्माचे ही बांध पुरोगामी संघर्ष परिषदेने ओलांडले असल्याचे मत राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर दौऱ्यावर आले असता कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी सबलीकरण योजनेच्या अटी संदर्भात निदर्शने, मोर्चा व कलेक्टरना निवेदन दिल्यानंतर कोल्हापूर जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषदेने आयोजित केलेल्या शासकीय विश्रामगृहावर पदाधिकार्यांच्या निवडी व सत्कार प्रसंगी बोलत होते.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य सल्लागार कमिटीचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे, राज्य संघटक अमोल महापुरे, पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा सौ स्वाती सौंदडे, कोल्हापूर जिल्हा वरिष्ठ अध्यक्ष संभाजी चौगुले, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रकाश वायदंडे, कोल्हापूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष अमोल सोनावळे, कोल्हापूर जिल्हा युवकचे अध्यक्ष मुसा (भाई )मुल्ला, संपर्कप्रमुख विठ्ठल चौगुले, जिल्हा उपाध्यक्ष राधा कांबळे, शहर जिल्हाध्यक्ष पार्वती अडसुळे, जिल्हा संपर्कप्रमुख विठ्ठल चौगुले, पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख लखन वायदंडे, बँड, बँजो व इतर कलावंत आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विजयभाऊ सावंत, कर्नाटक राज्याच्या प्रदेशाध्यक्षा सौ.सविता बनसोडे, वाहतूक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष स्वप्निल बनसोडे, सुभाषराव साळुंखे, नैना लोंढे, अतुल वागमारे ,अक्षय खुडे, भास्कर खिलारे, सुकेशनी साठे, रमेश साठे ,सीमा साठे,अमर शिंदे इत्यादी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.