Uncategorized

धाराशिव साखर कारखान्यावर ऑक्सिजन निर्मितीच्या पायलट प्रकल्पास जिल्हाधिकारी यांनी दिली भेट

अभिजित पाटील यांचे केले विशेष कौतुक

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर:-देशासह राज्यात कोरोना महामारीचं संकट दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. त्याच अनुषंगाने आपल्या धाराशिव साखर कारखान्यामध्ये महाराष्ट्रात प्रथमच ऑक्सिजनची निर्मिती ‘पायलट प्रकल्प’ सुरू करण्यात येत आहे.

धाराशिव साखर कारखान्यावर ऑक्सिजन निर्मिती करण्याचे सुरू आहे. त्यातच आज वाढत्या ऑक्सिजनच्या मागणीमुळे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी धाराशिव साखर कारखान्यावर येऊन पाहणी केली. यावेळी मौज इंजिनिअरींगचे .धिरेन ओक, भारी यांनी प्रकल्पाबाबत संपुर्ण माहिती दिली. जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर प्रकल्प चालू करून ऑक्सिजनचा पुरवठा सुरू करावा असे सांगितले.

इथेनॉलची निर्मिती थांबून ऑक्‍सिजनचा प्रकल्प सुरू करण्याचे धाडस चेअरमन अभिजित पाटील यांनी दाखवुन सामाजिक बांधिलकीचे पाऊल टाकले आहे. कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्यांना लाखोंना जीवनदान देण्याचे काम या माध्यमातून होईल त्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती.रुपाली आवळे मॅडम, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,उपविभागीय अधिकारी कळंब डॉ.श्रीमती.अहिल्या गाठाळ मॅडम, तहसिलदार रोहन शिंदे, मंडळ अधिकारी देवानंद कांबळे, चोराखळी तलाठी श्रीकृष्ण कावळे आदी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close