Uncategorized

राजाभाऊ खिलारे यांचेकडून माणुसकीचे दर्शन खितपत पडलेल्या निराधार रुग्ण वृद्धाचे वाचवले प्राण

जोशाबा टाईम्स वेब न्यूज़ पोर्टल

श्रीकांत कसबे

अकलूज प्रतिनिधी:-सध्याच्या काळात माणुसकी हरवत चालली असल्याची आपण अनेक उदाहरणे पाहतो मात्र अकलूज येथे एका निराधार वृद्धास रुग्णास उपचार करून त्याला जीवनदान दिल्याची घटना घडली असून या कामी सामाजिक कार्यकर्ते दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ खिलारे यांनी ही भूमिका पार पाडत समाजाला नवीन आदर्श घालून दिला आहे.

अकलूज बस स्थानकात गेल्या काही दिवसापासून प्रकाश मधुकर राजे नावाचा नागपुर येथील एक निराधार वृध्द वावरत होता. वयाने मध्यम असला तरी स्वच्छ व टापटीप असणारा हा इसम सुशिक्षित वाटत असला तरी गेले काही दिवसापासून तो काही कारणाने अकलूज बस स्थानक परिसरात राहत असून अकलूज बस स्टँडवर मुक्काम करतो. गेल्या काही दिवसापासून अशक्तपणा आणि चिकनगुनिया सदृश्य आजार झाल्याने अकलूज बस स्थानकातील महबूब पान शॉप चे मालक मेहबूब शेख यांनी डॉक्टरांना बोलवून त्यांच्यावर उपचार केले परंतु चिकनगुनिया सदृश्य आजारामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होत चालली होती याबाबत अकलूज मधिल सामाजिक कार्यकर्ते व धडाडीचे गोरगरिबांचे नेते राजाभाऊ खिलारे यांच्याशी संपर्क साधून पत्रकार विष्णु बिचकुले यांनी माहिती दिल्यानंतर म्हणजे फोनवर माहिती मिळाल्यानंतर अवघ्या पाचच मिनटात खिलारे यांनी सदर ठिकाणी जाऊन सदर इसमाला ॲम्बुलन्सने अकलूजच्या सरकारी दवाखान्यात ऍडमिट केले व डॉक्टरांना सदर इसमावर चांगले उपचार करण्यास सांगितले त्यांच्या या तातडीच्या व तडकाफडकी निर्णयामुळे अकलूजच्या बस स्थानकावरील त्या निराधार वृध्द रुग्णाचा जीव वाचला.याकामी अकलूज उपजिल्हा रुगणालयातील डॉ जामदार ,डाँ गुडे व अकलूजच्या सर्व डॉक्टर मंडळीनी तत्परता दाखविली व त्या रुग्णाला जीवदान मिळाले त्यामुळे सर्व स्तरातून राजाभाऊ खिलारे यांच्या या कार्याचे व माणुसकीच्या दर्शनाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close