Uncategorized

समन्यायी पाणी वाटप आणि बंदिस्त पाईप लाईन हे चळवळीच्या रेट्याचे फलीत:आनंदराव बापू पाटील

जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचेही मोलाचे योगदान

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

 

आटपाडी ( प्रतिनिधी )
श्रमिक मुक्ती दल, समान पाणी वाटप संघर्ष चळवळ यांच्या लढ्याने आणि जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्चा मोलाच्या सहकार्याने आटपाडी तालुक्यात बंदिस्त पाईपलाईन द्वारे समन्यायी पाणी वाटप योजना कार्यान्वीत झाल्याचे गौरवोदगार या लढ्यातील एक मातब्बर नेते आनंदराव बापू पाटील यांनी काढले .
मासाळवाडी लाईन वरील बंदिस्त पाईल लाईन मधून आलेल्या कृष्णामाईच्या पाण्याचे नतमस्तक होवून आनंदरावबापू पाटील यांनी स्वागत पुजन केले . क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी , क्रांतीमाता इंदुताई पाटणकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्मरण करण्यात आले . ढोल तालाच्या निनादात चळवळ आणि चळवळीच्या नेत्यांच्या विजयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या .
क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी डॉ भारत पाटणकर यांच्या नेतृत्वा खाली १९९२ पासून सुरु असलेल्या पाणी चळवळीच्या रेट्यानेच टेंभू योजना अस्तित्वात आली . २००५ साली आझाद मैदान येथे केलेल्या प्रचंड आंदोलनाने समन्यायी पाणी वाटपाचे मागणीवर तत्कालीन उपमुख्यमंत्री आर .आर पाटील जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर , अन्य मंत्री व अधिकाऱ्यांच्या समवेत झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले . विसापूर येथे केले गेलेल्या बंदिस्त पाईपलाईन च्या प्रयोगाला समोर ठेवून टेंभू योजनेचे सर्व पाणी समन्यायी आणि बंदिस्त पाईपलाईन ने द्यावी ही मागणीही चळवळीने रेटून धरली . मागच्या सरकारने सगळे पाण्याचे स्त्रोत एकत्रित करून एकात्मीक समन्यायी वाटप करीत बंदिस्त पाईपने पाणी देण्याचा निर्णय केला . यासाठी चळवळीच्या नेत्याबरोबर शासनकर्त्यानी चर्चेच्या केलेल्या वेगवेगळ्या बैठका आणि माहुली पंप हाऊसला जलसंपदा च्या प्रधान सचिव मेंढेगिरी यांनी दिलेल्या भेटीवेळी झालेल्या चर्चेत प्रथम प्राधान्याने टेंभू ला समोर ठेवून आटपाडी, तासगांव आणि सांगोला तालुक्यासाठी बंदिस्त पाईपलाईनचा पथदर्शक प्रकल्प राबविण्यावर एकमत झाले . त्यानंतर जलसंपदा चे प्रधान सचिव चहल यांनी चळवळीच्या नेत्यांबरोबर चर्चा करून अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले . नंतर शासनाने आटपाडी तालुक्याला पायलट प्रोजेक्ट साठी निर्धारीत करून पुढे काम केल्यानेच आटपाडी तालुक्यात सर्वत्र बंदिस्त पाईप लाईनने पाणी आल्याचे दिसत आहे. आणि हे केवळ चळवळीने केलेल्या दीर्घ लढ्याचेच यश असल्याचे अभिमानपूर्वक आनंदराव बापू पाटील यांनी सांगीतले . बंदिस्त पाईप लाईन मधून पाण्याची चाचणी घेण्यासाठी पाणी सोडण्यास अधिकारी तयार नव्हते . मागील सरकारच्या काळात चळवळीच्या नेत्यांना प्रत्येक पाळीच्या वेळी मोर्चा, आंदोलन केल्याशिवाय आटपाडी तालुक्यात पाणी सोडले जात नव्हते तथापि राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंतराव पाटील यांनी दिलेल्या आदेशामुळेच गरजेच्या वेळी न मागता आटपाडी तालुक्यात सर्वत्र पाणी सुटल्याचे दिसत असून जिल्ह्यातल्या विविध पाणी योजनांना गती देण्याचे, त्या पुर्णत्वास नेण्याच्या कामी जयंतराव पाटील यांचे मोलाचे योगदान लाभल्याचे आनंदरावबापु यांनी स्पष्ट करून या लढ्यामध्ये हजारो ज्ञात अज्ञात आंदोलनकर्त्यांचा सहभाग असल्याने हे यश मिळू शकले . पाणी चळवळीच्या निमित्ताने १९९२ साली प्रथमतः डॉ. भारत पाटणकर ,क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडीना आटपाडी तालुक्यात आणणारे सादिक खाटीक, शाम देशपांडे, विलास खरात यांचा आवर्जून उल्लेख आनंदराव बापू पाटील यांनी यावेळी केला .
१९९३ सालापासून जनतेने केलेल्या प्रदिर्घ संघर्षाच्या परिणामी समन्यायी पाणीवाटप आणि बंदिस पाईप लाईनचा प्रयोग आटपाडी तालुक्यात अखेरच्या टप्यात आला आहे सांगोला आणि तासगांवची तशीच फेरआखणी चालु आहे .आता सरकारने महाराष्ट्रभरातील सर्व जिल्ह्यामध्ये आटपाडी पॅटर्न सार्वत्रिक करावा .असे मत या लढ्याचे मुख्य प्रणेते डॉ. भारत पाटणकर यांनी दुरध्वनी वरून बोलताना व्यक्त केले .
यावेळी आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती विजयसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक, तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ यमगर, राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस विजय पुजारी, माडगुळ्याचे नेते मनोहर विभूते, भाऊसाहेब कुलकर्णी, विकास विभूते, महात्माजी पाटील ,आबासाहेब मरगळे, सुखदेव दाईगडे ,रामभाऊ दाईंगडे, प्रा . विशाल यादव सर, योगेश सरगर सर, शशिकांत मुढे, प्रविण भिंगे ,शंकर तळे हे मान्यवर उपस्थित होते .

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close