Uncategorized

क्रेडाई गृहोत्सव २०२६’ या प्रदर्शनाचे शुक्रवारी उद्घाटन

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन, १२० स्टॉल्सचा समावेश

 

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :  क्रेडाई पंढरपूरच्या वतीने क्रेडाई गृहोत्सव २०२६ या प्रदर्शनाचे दि. १६ ते १८ जानेवारी या कालावधीमध्ये येथील रेल्वे ग्राउंडमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १६) रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे. या गृहोत्सवात विविध गृह प्रकल्पातील फ्लॅट्स, रो हाऊसेस, शॉपिंग कॉम्प्लेक्स, ओपन प्लॉट्स, नामांकित बिल्डर्स, बांधकाम क्षेत्रातील सप्लायर्स, मटेरियल विक्रेते, होम लोन इन्स्टिट्यूशन्स, नवीन तंत्रज्ञान यासह एकूण १२० स्टॉल्सचा समावेश असल्याची माहिती क्रेडाई पंढरपूरचे अध्यक्ष आशिष शहा यांनी दिली.

या उ‌द्घाटनप्रसंगी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे,सचिव आशिष पोखरणा, आमदार समाधान आवताडे, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक, आमदार अभिजित पाटील, पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके, प्रणव परिचारक आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

क्रेडाई गृहोत्सव २०२६या गृह प्रदर्शनामध्ये पंढरपूरमधील नामांकित बिल्डर्स यांच्या विविध गृह प्रकल्पांची माहिती विविध स्टॉल्सच्या माध्यमातून दिली जाणार आहे. आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे प्रदर्शन म्हणजे ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी.

आशिष शहा, अध्यक्ष, क्रेडाई पंढरपूर

प्रदर्शनाच्या निमित्ताने पंढरपूर येथील रेल्वे ग्राउंड च्या मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे. पंढरपूर परिसरात उभा करण्यात येत असलेले विविध गृह प्रकल्पातील फ्लॅट्स रो हाऊसेस शॉपिंग  कॉम्प्लेक्स, ओपन प्लॉट्स याशिवाय पंढरीतील नामांकित बिल्डर्ससोबतच बांधकाम क्षेत्रातील सप्लायर्स, मटेरियल विक्रेते, होम लोन इन्स्टिट्यूशन्स आणि नवीन तंत्रज्ञानासह एकूण १२० स्टॉल्सचा समावेश आहे. क्रेडाई पंढरपूर आयोजित क्रेडाई गृहोत्सव २०२६ हे प्रदर्शन दि. १६ ते १८ जानेवारी या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत खुले असून सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.

या गृह प्रदर्शनाला पंढरपूरसह,मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, मोहोळ आणि आसपासच्या तालुक्यातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन क्रेडाई पंढरपूरचे अध्यक्ष आशिष शहा, उपाध्यक्ष शार्दुल नलबिलवार, सचिव शशिकांत सुतार, खजिनदार महेश आराध्ये, सहसचिव शरदचंद्र कुलकर्णी, पी. आर.ओ. मिलिंद वाघ, वूमन विंग को-ऑर्डिनेटर श्रिया शिरगावकर, युथ विंगचे यश देशपांडे यांनी केले आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close