Uncategorized

.पंढरपूर येथे भारतातील पहिले ग्रीन बिल्डिंग या विषयावरील वर्कशॉप संपन्न!

 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसब

पंढरपूर :-पंढरपूर येथे भारतातील पहिले ग्रीन बिल्डिंग या विषयावरील वर्कशॉप घेण्यात आले त्याप्रसंगी अल्ट्राटेक कंपनीने ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेट मिळण्यासंदर्भातील नियम व फायदे यांची सविस्तर माहिती मांडली. जागतिक वाढलेल्या नैसर्गिक बदलासाठी ग्रीन बिल्डिंग संकल्पना ही फार गरजेची आहे. यासाठी इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल ने पुढाकार घेऊन नागरिकांना झिरो कार्बन व पर्यावरण पूरक बांधकाम करण्यासाठी प्रवृत्त केले आहे.त्यासाठी नगरपालिकेकडून घेण्यात येणाऱ्या करांमधे सूट दिलेली आहे.तसेच प्रकरण दाखल करताना देखील कर कमी केलेला आहे. अशा बिल्डिंग साठी वाढीव बांधकाम क्षेत्र वाढवून दिलेले आहे. तसेच यासाठी लागणारे विविध उपकरणे त्यांच्यावरही सुट दिलेली आहे. सोलर ऊर्जेच्या वापराने लाईट बिलही पूर्णतः माफ होत आहे. त्यासाठी जास्तीत जास्त इंजिनियरस् यांनी याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवावा व पर्यावरण पूरक बिल्डिंग बांधकाम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे.त्यासाठी जे काही नियम असतील त्या नियमातून बांधकाम कसे करायचे याची कार्यशाळा पंढरपूर येथे संपन्न झाली . लायसन्स इंजिनियर असोसिएशन व अल्ट्राटेक सिमेंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी    वाढत्या काँक्रीट जंगलात झिरो कार्बन व पर्यावरण पूरक बांधकाम हि येणाऱ्या काळाची गरज आहेअसे विचार बाळकृष्ण कुलकर्णी यांनी व्यक्त केले. नगर परिषदेचे उप मुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी नगरपालिकेकडून जे काही सहकार्य असेल ते मी करेन तसेच ग्रीन व क्लीन पंढरपूर यासाठी ठिकठिकाणी झाडे लावणे या उपक्रमात मिळून कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक डॉ.प्रशांत पवार यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अल्ट्राटेक कंपनीच्या त्रेशा जॉन, इंजिनीयर शितलराज शिंदखेडे यांनी मार्गदर्शन केले.

इंजिनीयर सुहास वसेकर ,विनायक खडपे ,राकेश पाटील यांनी माहिती दिली. भारतातील पहिली ग्रीन बिल्डिंगची कार्यशाळा घेण्यासाठी जो बहुमान अल्ट्राटेक कंपनीने आपल्या असोसिएशनला दिला त्याबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष सारंग कोळी यांनी त्यांच्या आभार मानले व पंढरपुरातून एक वर्षभरात किमान 101 ग्रीन बिल्डिंग रजिस्ट्रेशन करू अशी सर्वां तर्फे ग्वाही दिली . या कार्यक्रमास नगरपालिका नगर अभियंता नेताजी  पवार,नगरपालिकेचे इंजिनियर सोमेश धट , इंजिनिअर राजकुमार काळे हे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंजिनिअर असोसिएशनचे सोमनाथ काळे , सचिन माळवदे अमित लाडे संतोष कचरे ,पांडुरंग अलोनी, जितू बत्रा ,राजकुमार आटकळे, बाळ कुंभार , ललित पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण जगताप यांनी केले व उपस्थितांचे आभार असोसिएशनचे अध्यक्ष सारंग कोळी यांनी मानले..

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close