ॲड.रोहित एकमल्ली यांना” संविधान रत्न” पुरस्कार जाहीर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-ऑल इंडीया फेडरेशन ऑफ ॲडव्होकेट ॲंन्ड असोसिएशन दिल्ली यांच्याकडुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकीलीला १०० वर्षे पुर्ण झाल्यामुळे संपुर्ण भारतातील निवडक वकीलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी सोलापुर जिल्ह्यातील पंढरपुर येथील ॲड.रोहित एकमल्ली यांच्या निवडीचा संदेश ऑल इंडीया फेडरेशन ऑफ ॲडव्होकेट ॲंन्ड असोसिएशन दिल्ली चे ॲड.किसन थूल यांनी दिला आहे. ॲड.रोहित एकमल्ली हे गोर-गरीब , दलित-आदिवाशींसाठी लढत असतात त्यामुळे पंढरपुर येथील दलित चळवळीतील प्रबुद्ध परिवाराचे ज्येष्ठ नेते सुनिल वाघमारे यांनी ॲड.रोहित एकमल्ली यांचे नाव दिल्ली येथील टिम ला सुचवले होते.
पुरस्कार वितरण कार्यक्रम दि.०१/१०/२०२३ रोजी तळेगाव दाभाडे, पुणे येथील डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंगल्यावरती होणार आहे. या कार्यक्रमासाठी संपुर्ण महाराष्ट्र व भारतातून मोठमोठे वकील उपस्थित राहणार आहेत.
सा. जोशाबा टाईम्स परिवाराचे वतीने हार्दिक अभिनंदन!