स्त्री हक्क असलेलं हिंदू कोड बिल नाकारण्याचे पाप काँग्रेसचेच –संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यांचा घणाघात

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
करोली-टी– (ता.कवठेमहांकाळ)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकसभेत मंत्रिमंडळासमोर स्त्रियांना अनेक अधिकार व हक्क असलेले ,ओबीसींच्या हक्कांचाही त्याच्यामध्येच समावेश असलेलं हिंदू कोड बिल तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरुंच्या संमतीनेच मंत्रिमंडळासमोर मंजुरीला ठेवले असताना मंजुरीच्या वेळी खुद्द पंडित नेहरू व इतर मंत्रिमंडळ सदस्यांनी हिंदू कोड बिलाला तीव्र विरोध केल्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेमंत्री पदाचा जाहीर निषेध म्हणून राजीनामा दिला होता. त्यामुळे मंजुरीसाठी हिंदू कोड बिल मांडा म्हणणारे तत्कालीन पंतप्रधान नेहरू हे काँग्रेसचे असल्यामुळेच स्त्रियांना समान हक्क असलेले हिंदू कोड बिल नाकारण्याचे पाप हे काँग्रेसचच असल्याचा घणाघात पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी केला ते करोली टी (ता कवठेमंकाळ) येथे मातंग समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष रविभाऊ चंदनशिवे होते.
पुढे बोलताना प्रा. वायदंडे म्हणाले की, हिंदू कोड बिलामध्ये स्त्री समानता, शासकीय किंवा खाजगी क्षेत्रात नोकरी करत असलेल्या स्त्रियांना समान अधिकार व समान वेतन आणी बढती, वडिलांच्या संपत्ती मध्ये व प्रॉपर्टी कार्डावर स्त्रीच्या नावाची नोंद होण्याची तरतूद, स्त्रीयांच्या राजकीय समान हक्काबद्दलची तरतूद असे अनेक हक्क स्त्रियांना दिले जाणार होते. इतकंच काय तर त्या हिंदू कोड बिलाची घटनेतील अंमलबजावणीसाठीही काँग्रेसने विलंब लावल्याची टीका प्रा.सुभाष वायदंडे यांनी केली.
अध्यक्षीय मनोगतात रविभाऊ चंदनशिवे म्हणाले शिक्षणाशिवाय पर्याय नाही समाजानं चांगुलपणा समजून घेऊन एकमेकाशी सलोखा राखावा.
स्वागत व प्रास्ताविक प्रा.जे.पी. चंदनशिवे यांनी केले.तर कार्यक्रमाचे नियोजन युवानेते किसन चंदनशिवे व माजी सरपंच अमोल चंदनशिवे यांनी केले.
यावेळी जगन्नाथ भोरे, सचिन वायदंडे ,श्रीमंत चंदनशिवे, तुकाराम चंदनशिवे, वसंत माने ,चंद्रकांत कर्पे, वैभव कर्पे,सतीश कर्पे, माधुरी चंदनशिवे,शशिकला चंदनशिवे, पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य संसदीय मंडळाचे सदस्य दादासाहेब कांबळे, जिल्हा सरचिटणीस सर्जेराव भंडारे,वरिष्ठ जिल्हाध्यक्ष खंडू कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष अक्षय खुडे, अतुल वाघमारे, शुभना लोंढे,इत्यादी प्रमुख व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी आभार माधुरी चंदनशिवे यांनी मानले.